When will Shrigondekar get chicken water? 
अहिल्यानगर

कुकडीचे पाणी श्रीगोंदेकरांना मिळणार कधी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत "कुकडी'च्या आवर्तनाबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. बैठकीतील चर्चेचा रोख पाहता, "कुकडी'चे पाणी श्रीगोंदेकरांना मिळेल की नाही, याचीच आता भीती आहे. 

दरम्यान, कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडायचे की नाही, हे पिंपळगाव जोगेच्या आवर्तनानंतर ठरेल, असे समजते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पिंपळगाव जोगे डाव्या कालव्याचे 22 दिवसांचे आवर्तन उद्या (ता. 10) सुरू करण्याचा निर्णय झाला.

तालुक्‍यातील नेत्यांनी "कुकडी'च्या आवर्तनाची मागणी केली; परंतु "कुकडी'च्या आवर्तनाबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. केवळ आवर्तन कसे करता येईल, याबाबत चर्चा झाली. त्यानुसार पिंपळगाव जोगेचे आवर्तन झाल्यानंतर धरणातील अचल साठ्याचा आढावा घेऊन पिंपळगाव जोगेतून किती पाणी येडगाव धरणात सोडायचे, यावर निर्णय होईल.

आवर्तनापुरते पाणी येडगावमध्ये येण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असला, तरी येडगावमध्ये पाणी सोडल्याच्या दहाव्या दिवशी, म्हणजेच 10 मे रोजी "कुकडी'चे आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामध्ये जवळपास पहिले वीस दिवस पाणी खाली जाणार असल्याने, पावसाळ्याच्या तोंडावर, म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात श्रीगोंदेकरांना पाणी मिळू शकते, अशी माहिती समजली. त्याचबरोबर, घोड धरणातून उद्यापासून (ता. 10) घोड नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आजच्या सल्लागार समितीच्या बैठकीत पिंपळगाव जोगेचे आवर्तन उद्यापासून (ता. 10) सोडण्याचा निर्णय झाला. "कुकडी'च्या आवर्तनाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली; परंतु कोणताही निर्णय झाला नाही. पिंपळगाव जोगेचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर "कुकडी'च्या आवर्तनाबाबत निर्णय होईल. 
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT