शिकारीचे साहित्य ई सकाळ
अहिल्यानगर

रानडुकरांची शिकार करणाऱ्यास अटक

रायगड आणि नगर जिल्ह्यात आरोपींचा शोध सुरू

शांताराम काळे

अकोले : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनक्षेत्रात रानडुक्कर शिकार करत असताना एक आरोपीस अटक केली. चार जण फरारी आहेत.

(Wildlife hunter arrested in Akola)

वनपाल कोथळे यांस मिळालेल्या गुप्त बातमीतून सोमलवाडी शिवारामध्ये जंगली डूक्कराची बंदुकीने शिकार झाल्याची खबर मिळाली. त्यांनी तात्काळ वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची शहानिशा करून वरिष्ठांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणेश रणदिवे (सहा.वनसंरक्षक कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य), दत्तात्रय पडवळे (वनक्षेत्रपाल वन्यजीव राजूर) यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीची चक्रे वेगाने फिरवून मौजे गंभीरवाडी (सोमलवाडी)येथील एका संशयित आरोपीच्या घरातून अल्यूमिनियमच्या पातील्यात ठेवलेले जंगली प्राण्याचे मांस जप्त करून त्यास तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी दिली आहे.

रायगड व ठाणे जिल्हा येथील ४ आरोपींची संपूर्ण माहिती तपास अधिकारी यांच्या हाती लागली आहे.

अंतरजिल्हा रॅकेट असल्याचे उघड़ इाले आहे. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंद करून इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT