Wolf attack on grandparents 
अहिल्यानगर

आजी-नातीवर लांडग्याचा हल्ला

आनंद गायकवाड

संगमनेर : तालुक्‍यातील रणखांब येथील लांडगदरा परिसरात लांडग्याने धुमाकूळ घालून आजीसह तिच्या नातीला गंभीर जखमी केले. त्याने पाळीव जनावरांवरही हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (ता. दोन) दुपारी दीडच्या सुमारास घडली. 

रणखांब परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात जंगली हिंस्र श्वापदांचे अस्तित्व आहे. शुक्रवारी दुपारी घराच्या अंगणात काम करीत बसलेल्या चंद्रकला गोरख गुळवे व त्यांची नात ऋतुजा यांच्यावर लांडग्याने हल्ला चढवला. यात चंद्रकला यांच्या डाव्या हाताचे बोट तोडून पंजालाही जोराचा चावा घेतला, तर नात ऋतुजा हिची मान, चेहरा व हाताला चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले.

चंद्रकला यांनी जोरात आरडाओरडा केल्याने, परिसरातील ग्रामस्थांनी लांडग्याला पिटाळले. त्यानंतर या लांडग्याने अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू व शेळीवर हल्ला केला. यात सर्व पाळीव जनावरे जखमी झाली.

जखमी आजी व नातीवर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली असून, मानवी वस्तीवर उपद्रव करणाऱ्या या लांडग्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर देणगी वाद! ३५०० कोटी रोकड, सोन्या-चांदीचे रेकॉर्ड गायब; ६ वर्षांपूर्वी व्यवस्थापनाबाबत व्यक्त केलेली चिंता, ४ गंभीर त्रुटी

Ahilyanagar Crime: मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला ‘नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप’; अहिल्यानगर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Nilesh Lanke: सात-बारा कोरा करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा, नीलेश लंके यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयावर एल्गार

Koyna Dam History : कोयना धरणाचे पाणी ओसरले अन् उघड झाला पाण्याखाली लपलेला इतिहास; भग्न अवशेषांमधून समोर आलं जुनं वैभव, 74 वर्षांनंतर काय पाहायला मिळालं?

Mumbai Local: ए... दरवाजा बंद कर! लोकलमध्ये वादानंतर चाकूने भोसकलं, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डब्यात रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT