Crime esakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : महिला पोलिसांना महिलेकडून मारहाण

तुम्ही माझ्या नातेवाईकांची फिर्याद का घेत नाहीत, असे म्हणत एका महिलेने महिला ठाणे अंमलदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - तुम्ही माझ्या नातेवाईकांची फिर्याद का घेत नाहीत, असे म्हणत एका महिलेने महिला ठाणे अंमलदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली. ठाणे अंमलदार महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या इतर महिला पोलिसांना तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तुम्हाला सर्वांना कामालाच लावते, असा दम दिल्याची घटना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी घडली.

याप्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल जयश्री फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीमा गणेश काळे (रा.ब्रम्हतळे, भिंगार) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी फुंदे या ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर कार्यरत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास सीमा काळे ही महिला पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात गेली. तेथे फुंदे यांना तुम्ही माझ्या नातेवाईकांची फिर्याद का घेत नाही, अशी विचारणा केली.

त्यावेळी फुंदे या त्या महिलेस समजून सांगत तुमची फिर्याद व्यवस्थित सांगा, असे म्हणाल्या असता त्याचा राग येवून त्या महिलेने फुंदे यांना शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. त्यांच्या बचावासाठी तेथे असलेल्या महिला टी. एस. कांबळे, के. एस. काशीद, सहायक फौजदार कैलास सोनार हे आले असता सीमा काळे हिने या तिघांनाही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT