crime sakal
अहिल्यानगर

अहमदगनगर : बाजार समितीत भूखंड देतो असे सांगून महिलेवर अत्याचार

सकाळ डिजिटल टीम


पाथर्डी (जि. अहमदनगर) : बाजार समितीत भूखंड देतो असे सांगून आपल्यावर समितीतील पदाधिकारी महिलेच्या पतीने दोन वेळा अत्याचार केल्याचा गुन्हा एका महिलेने दाखल केल्यानंतर या प्रकरणातील आरोपी राजेंद्र विलास गर्जे (रा. पागोरी पिंपळगाव) याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करत न्यायालयासमोर उभे केले.

न्यायालयाने गर्जेला (ता.२९) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समितीने आपल्या मालकीच्या भूखंडाचे लिलाव पद्धतीने वाटप करण्याची जहिरात एका वृत्तपत्रात दिल्यानंतर आपल्याला भूखंड मिळावा, असा अर्ज तालुक्यातील कोल्हार येथील एका महिलेने केला होता. या नंतर या महिलेने (ता. तीन) रोजी समितीतील पदाधिकारी महिलेच्या पतीने आपल्यास भूखंड देतो असे सांगून पाथर्डी येथे एकदा व आपण राहत असलेल्या कोल्हार येथील घरी एकदा असा दोन वेळा अत्यचार केला.

गर्जे यांनीही त्या अगोदर कोल्हार येथील एक महिला व तिचा साथीदार आपल्याला भूखंड प्रकरणावरून दहा लाख रुपये खंडणी मागत असल्याची परस्पर विरोधी तक्रार पो.स्टे.ला दाखल केली होती. या तक्रारीनंतर प्राथमिक शिक्षक असलेला गर्जे हा फरार होता. मात्र, गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेत पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर गर्जे याला न्यायमूर्ती ए. एस. बिराजदार यांच्या समोर उभे केले असता न्यायालयाने त्याला येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डांगे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT