The woman's love affair with the accused 
अहिल्यानगर

तो आरोपी तिचा भैया नव्हे निघाला सैया

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : आढळगाव येथील मुकुंद वाकडे याच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून त्याची नातेवाईक सोनाली सतीश वाकडे (वय 24) हिला आज सकाळी पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, काल पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या अनुभवाची प्रचिती सगळ्यांना आली. सोनाली गुन्ह्यातील सहभाग नाकारतानाच आरोपीसोबत भावाचे नाते असल्याचे सांगत होती; मात्र अधीक्षकांनी तिला भावनिक प्रश्न विचारत विश्वासात घेतले आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. 

सोनालीसोबत गुन्ह्यातील मुख्य आरोपी दत्तात्रेय पठाडे या दोघांना आज न्यायालयाने 8 मेपर्यंत पोलिस कोठडी दिल्याचे तपासी अधिकारी विठ्ठल पाटील यांनी सांगितले. 

मृत मुकुंदची नातेवाईक सोनाली हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना होता. तिला काल अखिलेश सिंह यांच्यासमोर उभे केले, त्या वेळी तिने गुन्ह्यातील संबंध धुडकावला. आरोपी पठाडे व आपले बहीण-भावाचे नाते असल्याचे सांगितले. सिंह यांनी तिला विश्वासात घेतले. ते बोलत असताना सगळे केवळ पाहत राहिले आणि भावाचे नाते सांगणाऱ्या सोनालीच्या अश्रूंचा बांध फुटला. या चौकशीच्या आधारे आज सकाळी तिला अटक करण्यात आली. 

दरम्यान, मुकुंदचा खून सोनालीच्या चिथावणीवरून एकट्याने केल्याचे पठाडे सांगत आहे. तथापि, या घटनेत पायाच्या ठशांच्या आधारे आरोपींचा माग काढणाऱ्या आदिवासी तरुणांनी मात्र खून झाला त्या वेळी तेथे येणारे व पळून जाणारे दोघे असल्याचा ठाम दावा केला.

पोलिस अधीक्षकांसमोर त्यांनी प्रात्यक्षिकही दाखविले. त्यामुळे आता दुसऱ्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT