Women together to defeat Corona
Women together to defeat Corona 
अहमदनगर

कोरोना हरविण्यासाठी नारीशक्ती एकवटली... डोंगरगणमध्ये येणार्या प्रत्येकाची होतेयं कसून चौकशी..

दत्ता इंगळे

नगर तालुका : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांचे सहकार्य कमी मिळू लागल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चार महिन्यांपासून कोरोनापासून कोसो दूर असलेल्या डोंगरगणमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावाची सुरक्षा आता महिलांनी हाती घेतली असून, गावातील सीमांवर पहारा देण्यास सुरवात केली आहे. 

कोरोनाचा रुग्ण डोंगरगणमध्ये सापडल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य यंत्रणेकडे उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. या उपाययोजनेत आता गावातील महिलांनी पुढाकार घेत आपले योगदान देण्यास सुरवात केली आहे.

डोंगरगण हे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे पावसाळ्यात नेहमीच गर्दी होत असते. यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे परिसरातील निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येथे आता गर्दी होऊ लागली आहे. प्रशासन व ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही पर्यटक व भाविक डोंगरगणमध्ये गर्दी करीत आहेत. त्यांना रोखण्यासाठी आता येथील महिलांनीच पुढाकार घेतला आहे.

महिलांनी गावातील सीमांवर आता पहारा देण्यास सुरवात केली आहे. गावात येणाऱ्या बाहेरील पाहुण्यांसह पर्यटकांना आता सीमांवर अडवून त्यांना माघारी पाठविण्यास सुरवात केली आहे. 

कोरोना रुग्ण सापडल्याने तीन दिवसांचा बंद पाळण्यात आला असला, तरी यापुढेही काही दिवस सीमांवर महिलांकडून पहारा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रमुख रस्त्यांसह गावातील आडवाटेवरील रस्तेही अडविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस पाटील आदिनाथ मते यांनी दिली. 

गावातील सीमा अडविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या सीमा अडविण्यासाठी आता सरपंच कैलास पटारे व शंकर चांदणे यांनी पुढाकार घेऊन महिलांचे पथक तयार केले आहे. यामध्ये मीनाक्षी काळे, अलका पटारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची पथके तीन तीन तासांच्या अंतराने बंदोबस्ताचे कामकाज करीत आहेत.  

संपादन ः दौलत झावरे

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT