प्रियंका गुरव, सचिव, उबंटू फाउंडेशन
प्रियंका गुरव, सचिव, उबंटू फाउंडेशन sakal
अहमदनगर

womens-day : प्रवाहाबाहेरील मुलांसाठी ‘उबंटू’ची धडपड

वसंत सानप

कर्जत: सर्वांसाठी शिक्षण किंवा शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला असला, तरी बहुसंख्य मुले आजही शिक्षणाच्या परिघाबाहेरच राहिली आहेत. अशा मुला-मुलींसाठी एक भव्य कार्यक्रम घेऊन उबंटू फाउंडेशनने कंबर कसली आहे. ऊसतोडणी कामगारांची मुले, वीटभट्टीमध्ये काम करणारे बालमजूर, तसेच कातकरी समाजातील मुलांसाठी प्रामुख्याने हे फाउंडेशन काम करीत आहे. सचिव म्हणून काम पाहणाऱ्या प्रियंका त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ही कामगिरी पार पाडत आहेत.

प्रामुख्याने भीमा नदीपट्ट्यातील कोळसा तयार करणाऱ्या कातकरी समाजातील, तसेच ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, हेच उबंटू फाउंडेशनचे मुख्य ध्येय असल्याचे प्रियंका गुरव यांनी सांगितले. या मुलांसाठी राबवीत असलेल्या विविध उपक्रमांमुळे साक्षरतेच्या प्रकाशाकडे चाललेली मुलांची वाट अधिक सुकर होत आहे.

प्रियंका, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच यंदाच्या गळीत हंगामापासून ऊसतोडणी मजुरांच्या कोप्यांवर बाराखडीचा आवाज घुमत आहे. कामगार कामावर जाताना मुलांना बरोबर घेऊन जातात आणि सायंकाळी परत येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही. जवळपासच्या शिक्षकांनी मुलांना शाळेत नेण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयश आले.

या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी व मुलांच्या शैक्षणिक गरजा पाहून फाउंडेशनच्या सदस्यांनी पालक, तसेच अंबालिका कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी कोप्यांवर शाळा भरविण्याचे नियोजन झाले. मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे सिद्धटेकसह इतर गावांमध्येही शैक्षणिक वर्ग सुरू झाले.

एका अहवालानुसार, ऊसतोड कामगारांच्या केवळ सात टक्के कुटुंबातील मुले नोकरीत आहेत. त्याचप्रमाणे मुलींचे शिक्षणही सुरक्षिततेअभावी अर्धवटच राहते. याबाबत संबंधित विभागाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. ऊसतोडणी महिला कामगारांना गोधडी बनविण्याचे प्रशिक्षण देऊन, गोधड्यांना बाजारपेठही मिळवून देत आहोत.

- प्रियंका गुरव, सचिव, उबंटू फाउंडेशन

फाउंडेशनची उद्दिष्टे

स्थलांतरित मुलांना शासकीय शिधा मिळवून देणे.

ऊसतोडणी महिला कामगारांच्या हातातील कोयता बाजूला करणे.

कष्टक-यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे.

कायमस्वरूपी वसतिगृहे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करवून देणे.

फाउंडेशनला कशी मदत कराल?...

जुनी पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य,

जुन्या स्थितीतील सायकली, धान्य, तसेच जीवनोपयोगी वस्तू देऊन आपण मदत करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT