Work on Ahmednagar-Savlivihir National Highway from January 
अहिल्यानगर

नगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीपासून

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः नगर-कोपरगाव राज्यमार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मात्र, राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना त्याचे दोन तुकडे झाले. सावळीविहीर ते नगर या अंतरातील रस्त्याला 160 क्रमांक, तर सावळीविहीर ते येवला अंतरातील रस्त्याला 752-जी, असा क्रमांक मिळाला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची आज भेट घेतली. सावळीविहीर ते नगर अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या जानेवारीत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सावळीविहीर ते नगर राज्यमार्ग सात महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला. मात्र, राज्य सरकारने काम केलेला कोपरगाव ते नगरदरम्यान हा रस्ता निकृष्ट झाल्याने, दर पावसाळ्यात खड्ड्यांत जातो. यंदा त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर, खास बाब म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी 40 कोटी रुपये मंजूर केले. त्यातून खड्डे कसेबसे बुजविण्याचे काम सुरू आहे. ते येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करतात. 

सिन्नर, सावळीविहीर, शिर्डी ते नगर या अंतरातील 160 क्रमांकाचा हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग पुढे दौंड, बारामतीमार्गे थेट चिक्कोडीपर्यंत (कर्नाटक) जातो. सिन्नरपासून त्याचे काम वेगात सुरू आहे. ते कोपरगाव तालुक्‍याच्या हद्दीपर्यंत आले आहे. या संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशीच परिस्थिती सावळीविहीर ते मालेगाव या 752-जी या राष्ट्रीय महामार्गाचीही आहे. हा रस्ताही चौपदरी होईल. त्याचीही निविदाप्रक्रिया सुरू आहे. 

तीन महिन्यांसाठी 40 कोटींचा खर्च 
कोपरगाव ते नगर या निकृष्ट रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आजवर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडले. मात्र, रस्ता व्यवस्थित होत नाही. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला. मात्र, त्याची अवस्था एवढी दयनीय झाली, की तीन महिन्यांसाठी दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपये खर्चण्याची वेळ राज्य सरकारवर आली. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT