gatari
gatari 
अहमदनगर

गटारीने हटवली शेवगाव शहरातील अतिक्रमणे

सचिन सातपुते

शेवगाव (नगर) : शहरातील मुख्य बाजार पेठेतील भुमिगत गटारीच्या कामाला सुरुवात झाल्याने दुकानासमोरील अतिक्रमणावर संक्रांत आली आहे. गटारीच्या कामासाठी दुकानासमोर बांधलेले ओटे, पाय-या व इतर पक्की बांधकामे काढण्याची वेळ आल्याने दुकानदारांना मनस्ताप तर सर्वसामान्य नागरीकांना मोकळ्या रस्त्यामुळे दिलासा मिळाला आहे. 

शेवगाव नगरपरीषदेच्या १४ वित्त आयोगाच्या निधीतून प्रभाग सहा मधील मारवाड गल्ली कोपरा ते शिवाजी चौक या २२० मीटर लांबीच्या साडेचार लाख रुपये किंमतीच्या या भुमिगत गटारीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अरुण मुंढे यांच्या पुढाकारातून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामाला सुरुवात झाली असून या बाजार पेठेतील मुख्य रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूने पाईप टाकण्याचे काम सुरु आहे.

मात्र शहरातील बाजार पेठेचा हा मुख्य रस्ता दोन्ही बाजूंच्या दुकानदारांनी ओटे, पाय-या व इतर पक्क्या बांधकामाच्या अतिक्रमणाने आधीच अरुंद केला आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहनांनाच काय तर नागरीकांना पायी चालणे सुध्दा मुश्किल झाले आहे. दुकानदारांनी पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर गाडया पार्किंग करुन ग्राहक खरेदीसाठी जातात. या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बाजार पेठेतील वाहतुक कोंडी सर्वांसाठीच डोकेदु:खी झाली आहे. शिवाय उघडया गटारींमुळे बाजार पेठेतील दुर्गंधी व डासांचा ही त्रास पेठेतील सर्वांनाच सहन करावा लागत होता. 

आता भुमिगत गटारीच्या कामासाठी रस्त्यावर आलेले दुकानांचे ओटे, पाय-या काढून त्याखाली सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मोठा खर्च करुन आकर्षक तयार केलेला दुकानाचा दर्शनी भाग तोडण्याची नामुष्की दुकानदारांवर ओढवली आहे. रस्त्यावर आलेली ही अनधिकृत बांधकामे काढतांना अनेक दुकानदारांनी नाराजी व्यक्त करत खळखळ केली आहे. मात्र अतिक्रमणे निघाल्याने रस्ता रुंद झाल्याने नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. 

नगरपरीषदेने ठोस भुमिका घेण्याची गरज... 

हा रस्ता शहरातील सर्वात मुख्य रस्ता असल्याने गटारीचे व १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यावर अतिक्रमण होणार नाही यासाठी नगरपरीषदेने ठोस भुमिका घेण्याची गरज आहे. अन्यथा वारंवार होणा-या अतिक्रमणामुळे पेठेतील रस्त्यांचा कोंडलेला श्वास शहरवासियांसाठीही चिंतेची बाब आहे.
 
शेवगाव नगरपरीषदचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ म्हणाले, नगरपरीषदेच्या गटारींवर बांधकाम करणे नियमबाहय असून तसे आढळून आल्यास न.प. अधिनियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या गटारीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT