MALIWADA GANPATI NEWS 
अहिल्यानगर

नगरच्या गणेशोत्सवाबाबत यंदा हे ठरलं, मानाच्या मंडळांनी घेतला निर्णय

अमित आवारी

नगर ः नगरच्या गणेशोत्सवाला पुण्याप्रमाणेच महत्त्व आहे. काही गणेश मंडळांना शतकाची परंपरा आहे. विविध प्रकारचे देखावे येथील वैशिष्ट्य असते. श्री विशाल गणपतीला विसर्जन मिरवणुकीत मान असतो. देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडते. उत्सवाअगोदर तीन चार महिने त्याचे नियोजन चालते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मानाच्या गणेश मंडळांची बैठक आज झाली. शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. अभय आगरकर, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनेष साठे आदींसह माळीवाडा परिसरातील मानाच्या गणेश मंडळांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 
ऍड. अभय आगरकर म्हणाले, ""सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व मंदिरे बंद आहेत. कोरोना प्रादुर्भावाची स्थिती पाहता, सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरातही साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात येणार असून, विसर्जन मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे.'' प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. 

पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके म्हणाले, की गणेशोत्सवात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. याप्रमाणे नगर शहरातील व जिल्ह्यातील मंडळांनीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्रमंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्‍वर मित्रमंडळ, नवरत्न मित्रमंडळ, समझोता तरुण मंडळ, नीलकमल मित्रमंडळ, शिवशंकर तरुण मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शहरातील 12 गणेश मंडळांनी घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळे रस्त्यावर मंडप टाकणार नाहीत, मिरवणूक काढणार नाहीत. भाविकांच्या दर्शनासाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहेत. त्यामुळे यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव नेहमीपेक्षा वेगळा व साधेपणाने साजरा होणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT