Young man commits suicide in Rahuri for fear of re-lockdown 
अहिल्यानगर

पुन्हा लॉकडाउन लागण्याच्या भीतीने राहुरीत तरूणाची आत्महत्या

विलास कुलकर्णी

राहुरी : कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे जीवन संपवले आहे. बाधा होऊन मृत्यमुखी पडलेल्यांप्रमाणेच उपासमारी, नोकरी गमावल्याने, कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. कोरोना पुन्हा हातपाय पसरायला लागला आहे. पुन्हा लॉकडाउन लागले तर काय करायचे या भीतीपोठी राहुरीत काल अनुचित प्रकार घडला. 

राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील एका तरुणाने आज (सोमवारी) राहत्या घरात पत्र्याच्या ॲंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने बचत गटाचे कर्ज काढले होते. कोरोनाचा पुन्हा लॉकडाऊन झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? अशा विवंचनेतून आत्महत्या केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.

विष्णू बाबासाहेब गांगुर्डे (वय ३०, रा. गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी) असे मृताचे नाव आहे. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याने बचत गटाचे कर्ज घेतले होते. काही रक्कम मित्रांकडून हातउसनी घेतली होती. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव पुन्हा वाढला. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन सुरू होईल. या भीतीने त्याला ग्रासले होते.

कर्ज कसे फेडायचे. याची चिंता त्याने बोलून दाखवली होती. असे त्याच्या मित्रांनी सांगितले. मृताच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT