A young man has committed suicide by jumping into a well at Kukane  
अहिल्यानगर

कुकाण्यात विहिरीत उडी घेवून तरुणाची आत्महत्या; चौदा तासांच्या प्रयत्नानंतर मुतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा

कुकाणे (अहमदनगर) : कुकाणे येथील एका तरुणाने सोमवारी (ता.5) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तब्बल चौदा तासांची शोधमोहीम राबविल्यानंतर सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही.

प्रवीण बाबासाहेब पवार (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण याने सोमवारी त्याच्या घरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुकाणे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक किशोर काळे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन भाताने, अमोल बुचकूल, सचिन गणगे, आंबदास गिते घटनास्थली दाखल झाले. त्यांनी माजी सरपंच एकनाथ कावरे, सोमनाथ कचरे, रज्जाक इनामदार, बाळासाहेब गर्जे, राजेंद्र बागडे, अब्दुल शेख यांच्यासह काही तरुणांच्या मदतीने तब्बल चौदा तास शोधमोहीम राबविली. दरम्यान, सोमवारी सकाळी हा मृतदेह सापडला. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नेवासे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदेंनी पत्नीसह केली गणरायाची आरती; घरच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT