The youngest daughter remained pregnant 
अहिल्यानगर

अल्पवयीन मुलीला दिलं गुंगीचं अौषध पुढे झाला हा हादसा...

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : ती घरात एकटीच होती. त्यामुळे तिची असहायता एका तरूणाने हेरली. तो तिच्या घरी गुंगीचं औषध घेऊन गेला नि पुढे घडलं ते भयंकर होतं.

या घटनेतील पीडित मुलीला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पीरमहंमद ऊर्फ पप्या अहमदभाई शेख (वय 30, रा. कोरडगाव) असे आरोपीचे नाव आहे.

या बाबत पीडित मुलीने पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार, ऑक्‍टोबर 2019मध्ये दुपारी 16 वर्षीय पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी शेख तेथे आला. गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केले व तिच्यावर अत्याचार केला. तसेच, या बाबत कोणाला काही सांगितल्यास घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कोणाला काहीच सांगितले नाही.

नंतर कधी तरी तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. तिच्या जबाबावरून पोलिसांनी शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT