Youth Congress initiative for oxygen cylinder google
अहिल्यानगर

दिलासादायक ः नगरकरांना रोज मिळणार ५०० सिलिंडर

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

अशोक निंबाळकर

नगर ः कोरोना रुग्णांवर रेमडेसीव्हिर इंजेक्‍शन आणि ऑक्‍सिजन या दोन गोष्टीची उपचारात महत्वपूर्ण भूमिका आहे. नगरमध्ये अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा. लि. या कंपनीतर्फे ऑक्‍सिजन सिलेंडरची निर्मिती होते. कंपनीचे विलास लोढा यांनी रोज 500 ते 600 सिलेंडर कोरोना बाधितांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोसिम शेख यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

औषध कंपनीची संख्या मर्यादित असली तरी ऑक्‍सिजन सिलेंडर हे स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक क्षेत्राबरोबरच हॉस्पिटलसाठी या ऑक्‍सिजन सिलेंडरचा उपयोग होत असतो. सध्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्‍सिजनची अधिक आवश्‍यकता आहे. प्रशासनाच्या सहकार्याने आवश्‍यक असणाऱ्या रुग्णांलयासाठी ती उपलब्ध करुन दिली जातील.

मोसिम शेख म्हणाले, कंपनीतर्फे औद्योगिक वापराबरोबर हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजन सिलेंडरची निर्मिती करण्यात येत आहे. सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलेंडरसाठी विशेष यंत्रणा उभारली आहे. त्या माध्यमातून रोज 500 ते 600 सिलेंडर उपलब्ध करुन देणार आहेत. हॉस्पिटल बरोबरच औद्योगिक चक्रही सुरु राहिले पाहिजेत, परंतु सध्या नागरिकांचे प्राण महत्वाचे असून, त्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT