Zilla Parishad keys In the hands of a private person? 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेच्या चाव्या खासगी व्यक्तीच्या हाती? 

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेतील एका विभागात खासगी व्यक्तीकडून कामकाज करून घेतले जात असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यास संगणकाची माहिती नसल्याने खासगी व्यक्ती त्याची कामे करीत असल्याचे समजले. 

जिल्हा परिषदेतील काही विभागातील फाईल अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांऐवजी बाहेरील व्यक्ती घेऊन जात असल्याचे प्रकार घडलेले आहे. यावरून पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे या प्रकारांना काही अंशी पायबंद बसला होता. मात्र पुन्हा असे प्रकार आता सुरु झालेले असून जिल्हा परिषदेतील काही विभागातील फाईल आता कर्मचाऱ्यांऐवजी बाहेरील व्यक्ती या टेबलवरून त्या टेबलवर नेत असल्याची चर्चा सुरु असतानाच आता खासगी व्यक्तीची चर्चा सुरु झाली आहे. 

अवश्य वाचा ः येथे नांदतो अंधार... 

जिल्हा परिषदेतील संबंधित विभागात काही दिवसांपासून बाहेरील व्यक्ती येऊन कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे समजले. लॉकडाउन असतानाही ही व्यक्ती बिनदिक्कत जिल्हा परिषदेत येऊन कामकाज करीत होती. त्याची नियुक्ती कोणी केली, पगार कोण करतो, खासगी व्यक्तीची जिल्हा परिषदेत गरज आहे का, असे एक ना अनेक प्रश्‍न कर्मचारी वर्गातून होत आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून खासगी व्यक्ती येऊन कामकाज करीत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांमधूनच आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या संबंधित व्यक्तीचा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

वर्षानुवर्षे जागा अन्‌ कर्मचारी एकच 
काही विभागांमध्ये वर्षानुवर्षांपासून बदली होऊन कर्मचारी त्याच जागेवर राहत आहे. इतरांना कामकाज जमत नाही, असे कारण दाखवून त्याच कर्मचाऱ्यांना त्याच जागी पुन्हा आणण्याचे प्रकार घडत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. 

जिल्हा परिषदेत सर्व नियमित कर्मचारी कामकाज करीत आहेत. कोणी खासगी व्यक्ती कामकाज करीत आहे का, याबाबत चौकशी करण्यात करण्यात येईल.

- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT