Vaccination
Vaccination  sakal
अहमदनगर

अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनाही कोरोना लसीची मात्रा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: प्रौढांचे लसीकरण अंतीम टप्प्यात आले असताना मुलांचे लसीकरण(childrens vaccination) सुरू झाले आहे. आज शहरात १५ ते १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यास प्रारंभ झाला. महापौर रोहिणी शेंडगे(mayor rohini shendge) यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम झाला.

महापालिकेच्यावतीने(ahmednagar carporation) तोफखाना दवाखाना येथे 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण करण्यात आले. या वेळी आयुक्त शंकर गोरे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत नजान व तोफखाना दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना महापौर शेंडगे म्हणाल्या, की तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे. आज केंद्र सरकारच्यावतीने 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रारंभ झाला. पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे, जेणेकरून आपण या कोरोणाला हारू शकतो. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाय योजना राबवत आहोत.

आयुक्त शंकर गोरे म्हणाले, की केंद्र सरकारच्यावतीने आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रारंभ केला आहे. महापालिकेने विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आठ आरोग्य केंद्र व शाळा महाविद्यालयात मध्ये नियोजन केले असून, १९ हजार डोसचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करू. 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी फक्त कोविक्सेन लसीकरण दिले जाईल. पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन या वेळी करण्यात आले.

नागापूर आरोग्य केंद्रात प्रतिसाद

महानगरपालिकेच्या नागपूर आरोग्य केंद्रात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. काकासाहेब म्हस्के महाविद्यालयात लसीकरण सुरू करण्यात आले. या वेळी आरोग्य समितीचे सभापती डॉ. सागर बोरुडे, नागपूर आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. कविता माने, प्राचार्य शितल बांगर, पल्लवी सगळगिळे, रेखा चांदणे, शितल बांगर, नलिनी गवळी आदी उपस्थित होते. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याचे या वेळी डॉ. बोरुडे यांनी सांगितले.

कोरोना हद्दपार करण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकार प्रयत्न करते. परंतु कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, पूर्ण लसीकरण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सर्व डोस वेळेत घेणे आवश्यक आहे. तसेच झाल्यास लवकरच नगर शहर कोरोनामुक्त करू.

- रोहिणी शेंडगे, महापौर

विद्यार्थ्यांच्या लसीकरणास शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात नऊ सेंटरच्या माध्यमातून अकराशे विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. आता शाळा, महाविद्यालयांत जाऊन लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे आरोग्य केंद्रांवर गर्दी होणार नाही.

- डॉ. सतीश राजूरकर, आरोग्य अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT