crime
crime sakal
अकोला

अकोला : जिल्ह्यातून १०१ वी गुन्हेगारी टोळी हद्दपार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसणेकरिता दहिहांडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला. जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेली ही १०१ वी टोळी आहे.दहिहांडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार गोपाल प्रल्हाद वावरे (३४) रा. चोहट्टा बाजार आणि राहुल उर्फ गजानन सुरेश तायडे (३२) रा. देवळी, ता. अकोट यांचेवरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांचे विरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक यांचे कडे सादर केला होता. त्यानुसार दोन्ही गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.(Akola Crime News)

आतापर्यंत २८६ गुन्हेगारांवर कारवाई

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपावेतो एकूण ५२ गुन्हेगारांविरूध्द एमपीडीए ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली. ही आजपर्यतची अकोला जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये एकूण १०१ गुन्हेगारी टोळ्यांतील एकूण २४८ इसमांना तसेच कलम ५६ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये ३८ इसम, असे एकूण २८६ गुन्हेगारांना आजपर्यंत अकोला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.(Crime news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT