corona sakal
अकोला

अकोला : सहा दिवसांत आढळले १०८ रुग्ण

कोरोनाचे ३५ नवे रुग्ण आढळले; ॲक्टिव्ह रुग्‍णांची संख्या झाली ११९

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात हळूहळू कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांची बेफिकीरी त्यासाठी कारणीभूत असून सहा दिवसांतच कोरोनाचे(Corona) १०८ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यावासीयांच्या चिंतेत त्यामुळे भर पडली आहे. या रुग्णवाढीनंतर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची(Active patients) संख्या सुद्धा ११९ झाली असून सर्वच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता संसर्गाची साखळी खंडित होण्यायेवजी वाढण्याची दाट शक्यत आहे.

विदेशात कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉननं धुमाकूळ घालत असतानाच देशात सुद्धा ओमायक्रॉनचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे. त्यासोबतच कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा वाढत आहे. दिल्लीनंतर राज्यातील मुंबई व पुणे येथे कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत सल्याचे दिसून येत आहे. सहा दिवसांतच कोरोनाचे जिल्ह्यात १०८ रुग्ण आढळले आहे. सदर सर्व रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटण्यायेवजी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान १ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोनचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर २ जानेवारी रोजी एक, तीन जानेवारी रोजी १०, चार जानेवारी रोजी २८, पाच रोजी ३२ तर सहा जानेवारी रोजी ३५ रुग्ण आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाच्या ११९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.(Akola news)

गुरुवारी आढळले ३५ नवे रुग्ण

कोरोना संसर्ग आरटीपीसीआर तपासणीचे ६ जानेवारी रोजी जिल्ह्यात ४३८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४०६ अहवाल निगेटिव्ह तर ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये एक अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दोन रुग्ण रॅपिडच्या चाचणीत मिळून आले. त्यामुळे जिल्ह्यात गुरुवारी ३५ नव्या रुग्णांची भर पडली.(Covid test)

कोरोना मीटर

  • पॉझिटिव्ह 58023

  • मयत 1142

  • डिस्चार्ज 56762

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT