agar SYSTEM
अकोला

अकोला : मोर्णा नदीला पूर, १२ गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा

आगर (जि. अकोला) : आगर परिसरातील नवथळ, खेकडी, परितवाडा, उगवा, पाळोदी खाबोरा, गोत्रा, कंचनपूर, बादलापूर, हातरूण, दुधाळा, शिगोली मंडळा तसेच निंबा फाटा मार्गे येथून जवळच मोर्णा नदीला (morna river flood) प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे या पुराचे पाणी संपूर्ण शेत शिवारात शिरले. नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे. त्यामुळे २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण बारा गावाचा जनसंपर्क तुटला आहे. रस्ते तसेच नागरिक त्यांच्या घरांची पडझड झाली आहे व विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. (12 village lost contact due to morna river flood in akola)

जाणारी सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रथमच झालेल्या दमदार पावसामुळे खांबोरा गावातील नदीकाठी वस्ती असलेल्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, अनेकांचे घर पडले तसेच घरातील जीवनावश्यक सामान सुद्धा या पुरात वाहून गेल्याची माहिती येथील माजी सरपंच वासुदेवराव भरणे यांनी दिली. वन्यजीव प्राण्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून उगवा येथील दोन नागरिक शेतीची रखवाली करत असताना अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे शेतात घडल्यामुळे २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून दोन्ही रखवालदार आपला जीव मुठीत घेऊन रात्रभर झाडावरच अडकून राहिले. आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी होते. त्यामुळे त्यांना झाडावरून खाली उतरणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच जिल्हा प्रशासनाने विशेष ऑपरेशन राबवून या दोन रखवालदारांना झाडावरून सुखरूप वाचवले अशी माहिती अकोला तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली. सतत चार दिवस विदर्भात अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सुद्धा तो अकोला तहसीलदार यांनी केले आहे.

हातरूण रस्ता गेला पाण्यात वाहून -

आगर गावावरून गेल्या अनेक वर्षापासून हातरूण मार्गे निंबा फाटा तसेच शेगाव मार्ग जाणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परंतु, बुधवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसामुळे हातरूण मार्गे निंबा फाटा रोड संपूर्ण पाण्याखाली गेला. संपूर्ण रोड खचला आहे. त्यामुळे मोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना या रस्त्याने जाताना आता फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Live Update : पत्र राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सादर केले

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT