15 days extension for Akola RTE admission 
अकोला

चला तर, प्रवेशाला मिळाली 15 दिवसांची मुदतवाढ

विवेक मेतकर


अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उशीराने सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप केवळ एक हजार ६६७ विद्यार्थ्यांच्या पालकांनीच निश्चित प्रवेश घेतला असल्याने आरटीई कोट्‍यातील साडे सहाशे जागा रिक्त आहेत. परिणामी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आरटीई प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट शाळांमध्ये प्रवेश घेण्याची शेवटची तारीख होती.

यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. असे असले तरी प्रवेशासाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ३१ ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये जावून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केले होते. परंतु प्रवेशाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आता प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ‘प्रतीक्षाच’
आरटीई प्रवेशासाठी २ हजार ३२३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्यस्तरावर सोडत (लॉटरी) काढण्यात आली. सोडतीमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी एक हजार ६६७ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाला असून एक हजार ११७९ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्यांसाठी प्रवेशाची शेवटची तारीख वाढवल्यानंतर प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) मधील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT