unnamed.jpg 
अकोला

अकोल्यात तीन गर्भवतींसह 18 प्रसूत महिला पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच गर्भवती आणि बाळंतीण महिलांचे वैद्यकीय रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांपैकी आतापर्यंत 21 महिलांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. तर ट्रूनॅट नावाच्या अत्याधुनिक यंत्रणाने 28 महिलांची तपासणी केली असून, त्यामध्ये त्या संशयीत आढळल्या आहेत. 

जिल्ह्यात 7 एप्रिलला कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला. मे महिन्याच्या सुरुवातीपासून बाधितांचा आकडा आणि शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ होत गेली. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या व प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत 21 महिलांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सर्वोपचारमध्ये संदर्भीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसह आता गर्भवती महिलांमध्येही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गर्भवती व बाळंतीण महिलांनी सुरक्षात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

400 पेक्षा नमुन्यांची तपासणी
प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी व जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याअंतर्गत आतापर्यंत 400 पेक्षा अधिक जणींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी एकूण 21 महिलांचे अहवाल आजपर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी दिली. 

ट्रूनॅमध्ये 28 महिला संशयीत
जिल्हा स्त्री रुग्णालयातून आतापर्यंत 28 गरोदर आणि प्रसूत माता सर्वोपचार रुग्णालयात ट्रान्सफर केल्या आहेत. या महिलांची ट्रूनॅट नावाच्या अत्याधुनिक यंत्राद्वारे स्क्रीनिंग करण्यात आली आहे. त्यामध्ये त्या संशयी  आढळल्या आहेत. 

अशी घ्या काळजी
गर्दीची ठिकाणे व बाहेर पडणे शक्यतो टाळावे,  रेग्युलर तपासणीसाठी रुग्णालयात जाताना सुरक्षात्मक खबरदारी घ्या. शक्य त्या बाबी आपल्या डाॅक्टरांना फोनवर विचारावे, वैद्यकीय सल्ल्यानुसार घरातच चालण्याचा व हलका व्यायाम करावा,  आजारी व्यक्तीपासून दूर राहा. बाहेरून येणाऱ्यांशी थेट संपर्क टाळावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT