A 20-year-old man was killed on the spot when a tractor overturned 
अकोला

ट्रॅक्टर उलटल्याने विस वर्षीय तरुण जागीच ठार

सकाळ वृत्तसेेवा

बाळापूर (जि.अकोला) : ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टरचा विस वर्षीय तरुण चालक जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास नकाशी ते भरतपूर दरम्यान वाडेगाव-अकोला मार्गावर घडली. अक्षय गजानन जंजाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. तर एक जण अपघात होताच ट्रॅक्टरमधून फेकल्या गेल्याने तो बचावला. मृत युवक हा वाडेगाव येथील रहिवासी आहे.

वाडेगाव येथील जंजाळ नामक व्यक्तीच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन बार्शीटाकळी येथे गिट्टी आणण्यासाठी जात असताना नकाशी - भरतपूर दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. समोरुन चारचाकी वाहन आल्याने अक्षयने अचानक ब्रेक दाबले,

त्यामुळे ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने अक्षय जंजाळ याचा मृत्यू झाला. त्याला सर्वोपचारमध्ये मध्ये दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदना नंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानाच्या गणपतीच्या आरतीवरून वाद, ठाकरेंच्या नेत्याकडून शिंदेंच्या मंत्र्याचा पानउतारा, मग सत्कारात मागे ठेवून लागलीच घेतला बदला

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

काय नवरा एक्सचेंज ऑफर सुरुये? 'घरोघरी मातीच्या चुली'चा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- हिला सगळ्या भावांशी लग्न करायचंय...

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

SCROLL FOR NEXT