27 cattle rescued akot sakal
अकोला

Akot crime : २७ गोवंशांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा थरार

Akot crime : अकोटमध्ये २७ गोवंशांची निर्दय वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाचा थरार पोलीसांनी थांबवला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून वाहनासह गोवंश जप्त केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकोट : गोवंशाना वाहनात डांबून निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका आयशर वाहनाचा थरार आज अकोट मध्ये पाहायला मिळाला.

पोपटखेड गेट जवळ असलेल्या तपासणी नाक्याचे गेट तोडून हे भरधाव वाहन शहरात दाखल झाले मात्र अकोट ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्तिक पणे केलेल्या कारवाईत अडगाव खुर्द नजीक वाहन चालकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे. बुधवारी, २ आॅक्टोबररोजी अकोट ग्रामीण पोलीसांना माहीती मिळाली की, पोपटखेड गेटवरून एक मोठे वाहन भरधाव वेगाने शहरात येत आहे.

सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनमधून दोन टिम तयार करून तात्काळ घटनास्थळाकडे रवाना केल्या. पोलीसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव वेगाने व बेदकारपणे जातांना दिसला. पोलीसांच्या टिमचे त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने भरधाव वाहन चालवून पोलीसांच्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पोलीसांनी जीवाची बाजी लावून सदरचे वाहन अडगाव खु. येथे थांबविले असता. त्यामध्ये एकुण २७ गोवंश निर्दयपणे डांबून ठेवलेले दिसून आले. याप्रकरणी दोन आरोपीतांना ताब्यात घेतले आयशर वाहनासह एकुण २७ गोवंश किं अं. वीस लाख रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे सरहानपुर जिल्हयाचे (उत्तरप्रदेश) असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील कायदेशीर कार्यवाही अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT