कापूस  sakal
अकोला

बुलडाणा : सोयाबीन-कापूस उत्पादकांचा ३१ ला एल्गार; बुलडाण्यात होळी

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर उपेक्षा चालविली

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : केंद्रातील मोदी सरकार असो की राज्यातील आघाडी सरकार असो, त्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर उपेक्षा चालविली आहे. हे थांबविण्यासाठी व बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी रविकांत तुपकरांनी कंबर कसली असून त्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी चालविली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३१ ऑक्टोबरला बुलडाणा येथे विराट एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी येथे केली. दरम्यान विश्राम गृहासमोरील मोकळ्या जागेत सडलेल्या सोयाबीनची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

स्थानिक शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कथा अन व्यथा मांडून वरील इशारा देतानाच स्वतः न मरता (आत्महत्या न करता) मारायची तयारी ठेवा असे कळकळीचे आवाहन देखील तुपकर यांनी यावेळी केले. केंद्र शासनाने सोयाबीन ला ८ हजार तर कपाशीला १२ हजार प्रती क्विंटल रुपये किमान भाव राहावा यासाठी धोरण आखावे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरच्या मर्यादेशिवाय सरसकट ५० हजार रुपये मदत द्यावी, सोयापेंड आयात बंद करून पामतेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावी, लॉक डाऊन काळातील घरगुती वीजबिल माफ करून कनेक्शन कापणे बंद करावे, खाद्य तेल व तेलबियांवरील साठा मर्यादा अट शिथिल करावी, खरडून गेलेल्या नदीकाठच्या शेत जमिनी तयार करण्यासाठी १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी, कृषी पंपांचे बिल माफ करावे आदी मागण्यासाठी एल्गार मोर्चा व आंदोलन करण्यात येणार आहे असे तुपकर यांनी यावेळी सांगितले.

३१ तारखेला दुपारी १२ वाजता बुलडाणा शहराची ग्राम देवता असलेल्या (चिखली मार्गावरील) जगदंबा देवीला साकडे घालून नंतर जिजामाता महाविद्यालय समोरून निघणारा हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस, दुधाच्या प्रश्नावर वा विकासाच्या कॉमन इश्यूवर सर्व शेतकरी, पक्ष, नेते एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेते, त्यांना न्याय मिळतो. विदर्भात नेमके शेतकरी, पक्ष एकत्र येत नाही, बळीराजा पेटून उठत नाही, यामुळे आंदोलने फसतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना दिली.

यासाठी स्वाभिमानी सह अन्य पक्ष शेतकर्‍यांना एकत्र आणण्यात अपयशी ठरल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. मुळात विदर्भातील नेते या कामी कमी पडल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, नितीन राजपूत, पवन राजपूत, शेख रफिक, यासह कार्यकर्ते हजर होते. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा अन्यथा सत्ताधाऱ्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली नाही तर सरकारचा शिमगा करू. आज सोयाबीनची प्रतिकात्मक होळी केली, सरकार नमले नाही तर हे सरकार जाळायला मागेपुढे पाहणार नाही, असा जळजळीत इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT