341 Covid victims heirs of Applications  
अकोला

३४१ कोविड बळींच्या वारसांचे अर्ज मंजूर!

अर्ज मंजुरीमुळे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविडमुळे मृत्यूमुखी (Covid victims) पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी शासकीय अनुदान (मदत) मिळावे यासाठी पुरेसे कागदपत्र सादर न केल्याने गत आठवड्यात जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या ६०० जणांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. सदर अर्जातील त्रुटी व पुरेशे कागदपत्र संबंधितांच्या नातेवाईकांनी जोडावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आल्याने जिल्हास्तरावरून आतापर्यंत ३४१ जणांचे अर्ज मंजुर करुन शासनाकडे ऑनलाईन सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोविड बळींच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणात गत दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा सामना करत आहेत. संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. तसेच आजारावरही अनेकांचा प्रचंड खर्च झाला. त्यामुळे कोरोना मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. जिल्ह्यात अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य निधी जमा हाेणार आहे. त्यामुळे सदर अनुदानासाठी गत आठवड्यात जिल्ह्यातील ६०० जणांनी अर्ज केले होते. परंतु संबंधित अर्जांसाठी नातेवाईकांनी योग्य कागदपत्र न लावल्याने त्यांचे अर्ज मंजुर करण्यास विलंब होत होता. दरम्यान सदर संबंधी शासनाकडून पाठपुरावा करण्यात आल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून ३४१ अर्ज मंजुर करून शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.

अशी आहे अर्ज मंजुरीची प्रक्रिया

  • अनुदान मिळण्यासाठी अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने दस्तावेज अपलाेड करावे लागतात. मात्र अनेकांनी बॅकेची माहिती, काेविडमुळे मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांचे प्रमाणपत्र, रद्द केलेला धनादेश जाेडलेला नव्हता. त्यामुळे अर्ज मंजुरीस विलंब होत होता.

  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील असल्यास मनपा आणि अन्य क्षेत्रातील अर्ज असल्यास प्रथम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून अर्जाची तपासणी हाेते. त्यानंतर अर्जाची जिल्हास्तरीय समितीकडून पडताळणी हाेते व सदर पडताळणीत मंजुर केलेला अर्ज शासनाकडे जातो.

  • जिल्हास्तरीय समितीकडून अंतिम पडताणी केल्यानंतर अर्जाची त्याची माहिती शासनाकडे सादर हाेते. त्यानंतरच थेट शासनाकडून संबंधित नातेवाईकाच्या खात्यात अनुदान जमा होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT