4 90 crore received for akola development works Fund received under MLA Local Development Programme sakal
अकोला

Akola News : विकासकामांसाठी ४.९० कोटी प्राप्त; आमदार स्थानिक विकास कार्यक्रमानुसार मिळाला निधी

पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन् २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये आमदारांना विकास कामांसाठी शासनामार्फत पाच कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी याआधी ७५ लाखांचा निधी आधी प्राप्त झाला असून आता त्यात ७० लाखांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात आमदारांसाठी एकूण चार कोटी ९० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या नियोजन विभागाने जारी केला आहे.

मतदारसंघातील विविध कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला शासनाकडून निधी दिला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात.

आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अंमलात आणली जातात. छोटी-छोटी कामे करून मतदारांना खुश करण्याकरिता आमदार निधीचा आमदारांना उपयोग होतो.

दरम्यान सन् २०२३-२४ या वर्षात पाच विधानसभा व दोन विधानपरिषदेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करता यावी यासाठी ४.९० कोटींचा निधी मिळाला आहे.

आमदारांना प्रत्येकी पाच कोटी निधी

जिल्ह्यात विधानसभेचे आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारकासडे व आमदार नितीन देशमुखे हे पाच तर विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल व आमदार अमोल मिटकरी हे दोन आमदार असून प्रत्येक आमदारांना स्थानिक विकास निधी अंतर्गत पाच कोटी रुपये मिळणार आहेत.

त्यापैकी ७५ लाख याआधी मिळाले असून आता ७० लाखांची त्यात भर पडली आहे. एकूण निधीपैकी अद्याप अर्धाही निधी मिळाला नसल्याने आमदारांना मतदार संघात विकास कामे प्रस्तावित करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT