45 plus vaccine expired; 'Break' to vaccination File Photo
अकोला

४५ प्लसची लस संपली; लसीकरणाला ‘ब्रेक’

४५ वर्षांवरील नागरिकांसाठीचा साठा संपला; नियोजनाचा अभाव

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील १५१ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु शासनाकडून लसींचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहीम नेहमीच खोळंबत आहे. दरम्यान ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी जिल्ह्यात लसच उपलब्ध नसल्याने या गटातील लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. मोजक्याच केंद्रावर लस असल्याने त्याठिकाणी सुद्धा एक्‍कट दुक्कट लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील बहुतांश नागरिकांना निराश व्हावे लागत आहे. 45 plus vaccine expired; 'Break' to vaccination

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहेत. तसेच या वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळत देण्यात येत आहे परंतु त्याचा साठा अल्प मिळत असल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे.

७९ हजारांवर नागरिकांनी घेतली लस

जिल्ह्यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत एकूण ७९ हजार २१६ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामध्ये पहिला डोज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे, तर दुसऱ्या डोज घेणाऱ्यांची संख्या कमी आले.

कोव्हॅक्सिनचा डोस मिळेना

जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ८५१ लाभार्थ्यां कोव्हिशिल्डची लस देण्यात आली आहे. तर ३९ हजार ४४१ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला आहे. शासनामार्फत कोव्हॅक्सिनचा साठा मिळत नसल्याने या लसीचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता दुसऱ्या डोजसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातील बहुतांश लाभार्थी हे ४५ वयोगटावरील असल्याने काही लाभार्थ्यांना लस घेवून ९ आठवड्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. परंतु त्यांना आता लस मिळत नसल्याने व त्याचा साठाही उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांना लसीकरणाची चिंता लागली आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी सध्या लस उपलब्ध नाही. काही लसीकरण केंद्रांवर अल्प साठा असल्याने त्याठिकाणी लसीकरण करण्यात आले. लसीचा साठा शासनामार्फत मिळताच लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर

45 plus vaccine expired; 'Break' to vaccination

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT