अकोला

रस्ते विकासासाठी ४६ कोटींचा निधी

- केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारित व अद्यावत करण्यासाठी केन्द्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत ७ कामांसाठी ४६ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पूर्णा नदीवर दोनवाडा ते काटीपाटी दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

रस्ते विकास ही आर्थिक विकासाची नाळ असल्याने रस्त्यांच्या विकासावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सतत भर दिला आहे. दरम्यान त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील पूर्णा नदीवर दोनवाडा ते काटीपाटी दरम्यान (इजिमा ५३) नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी सुमारे ११.७ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. नवीन पुलाच्या बांधकामामुळे जिल्ह्यातील लोकांना आता दोनवाडा-काटीपाटी मार्गे दर्यापूरला जाण्यासाठी मदत होईल शिवाय वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होईल.

------------------

या कामांसाठी मिळाला निधी

० भांबेरी-पारळा-देवर्डा-मनब्दा-दापुरा-पारळा-निजामपूर वरील किमी १४ ते १९ किमी पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी ५.८६ कोटी रुपये

० नागद-सागद-कारंजा रमजानपूर-हातरुण रस्त्याच्या किमी ५ ते १२ किमी रस्त्याचे बांधकामासाठी ५.९३ लाख रुपये.

० नागद-सागद-कारंजा रमजानपूर-हातरुण रस्त्याच्या किमी १२ ते १९ किमी बांधकामासाठी ६.४१ कोटी रुपये.

० राज्य मार्ग २७८ उकळी बाजार-नेर-नांदखेड-किनखेड रस्त्याच्या कि.मी. ५० ते कि.मी. ५६ रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा कामासाठी ६.३२ कोटी रुपये

० राज्य मार्ग २८४ गोरेगाव-माझोड-आलेगाव-इसवी कि.मी. ५२ ते कि.मी. ९० मधील रस्त्याचे बांधकाम व सीडी वर्क कामासाठी ४.९४ कोटी रुपये

० प्रजिमा ५ शिरपूर-कारंजी-वाशीम रस्त्याच्या कि.मी. ० ते ६ मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५.८६ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT