Crime esakal
अकोला

Akola Crime : ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल

७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. दाळंबी शेतशिवरात ही घटना घडली. बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला बस स्थानकावरून ७८ वर्षीय वृद्ध महिला ही मंगळवारी दुपारी एसटी-बसनं दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती.

सव्वा दोनला दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला पोचली आणि तिथे उतरली. येथून गावाकडं पायी जात असताना तिथे ३ जन मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला रस्तालगत असलेल्या एका लिंबाच्या शेतशिवारात घेऊन गेले.

आणि तिघांपैकी एका तीस ते पस्तीस वर्षाच्या व्यक्तिनं तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय. हा प्रकार कोणाला सांगितल्यास, जीवे ठार मारू, अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.

या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले, तिने आरडाओरड सुरू केली, आवाज कानावर पडतातच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली, हे पाहताच अत्याचार करणारा व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला. ती दोन्ही व्यक्ती म्हातारी जवळ पोहचताच त्यांनी सुखरूप पणे तिला घरी सोडलं.

आणि म्हातारीनं आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर लागलीच कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठलं. आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT