Corona Update Akola Sakal
अकोला

अकोला जिल्ह्यात ९२ नवे पॉझिटिव्ह; ३५९ ॲक्टिव्ह रूग्ण

कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात रविवारी (ता. ९) ९२ नवे कोरोना बाधित रुग्ण (Corona Update Akola) आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३५९ झाली आहे. यापैकी बहुतांश रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. दरम्यान कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता. ९) आरटीपीसीआर कोरोना संसर्ग तपासणीचे(corona rtpcr test) ६५२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५७५ अहवाल निगेटिव्ह आले तर ७७ अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये एकाव्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर रॅपिडच्या चाचणीत १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात ९२ नव्या रुग्णांची भर पडली.

दरम्यान सध्या जिल्ह्यात ३५९ कोरोना बाधित उपचार घेत असून सदर रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे ५८ हजार २६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५६ हजार ७६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १ हजार १४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT