Crime News esakal
अकोला

Crime News : पोलिसांकडून अल्पवयीन मुलास बेदम मारहाण

वडिलांनी केली पोलिस अधिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

योगेश फरपट

अकोला : अकोट येथील पोलिस स्टेशनमध्ये गोवर्धन हरमकार या संशयीत आरोपीचे मृत्यूप्रकरण राज्यात चांगलेच गाजत असताना पुन्हा एकदा शहरातील सिव्हील लाईन्स पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास बेदम मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहे. याप्रकरणाने सिव्हील लाईन्स पोलिस अडचणीत येण्याची शक्यता आहे. रामनगरातील धनंजय ढोरे यांनी ही तक्रार केली आहे.

तक्रारीनुसार, कोणतेही कारण नसताना पोलीस स्टेशन सिव्हील लाईन्स येथील पोलीस हवालदार किशोर सोनोने, सुरेश लांडे, मोरे, गणेश नीलखन व गणेश यांनी त्यांच्या मुलास पोलीस स्टेशन मध्ये नेऊन एका खोलीमध्ये गैरकायदेशीररित्या मारहाण करीत अश्लिल शिवीगाळ केली. त्यांचा मुलगा १७ वर्षाचा असून २०१९ पर्यंत विठ्ठल नगर, उमरी अकोला येथे वडिलांच्या मालकीच्या घरामध्ये दोन खोल्यांमध्ये माझ्या परिवार सोबत राहायचो व माझी मोठी आई आशा सीताराम ढोरे ही दोन खोल्यांमध्ये राहत आहे. मालमत्तेला धरून वाद विवाद सुरु असताना तिने मी घरी नसताना त्यांची पत्नी जया हिला मारझोड केली. घरी आल्यानंतर माझ्या सोबत सुद्धा वाद केला. त्यानंतर आम्ही राम नगरात रहायला असून सामान त्या घरातून काढले नाही. आशाबाई नेहमीच आमच्या कुटुंबाविरुद्ध नेहमी पोलीस स्टेशनमध्ये खोट्या तक्रारी देत राहते.

तिने फेब्रुवारीमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध चोरीची तक्रार दिली व नंतर काही दिवसांनी माझ्या मुलाने तिच्या खात्यातून रू. ८,०००/- धनादेश द्वारे बँकेतून काढले अशी परत खोटा रिपोर्ट दिला. नंतर पोलीस हे माझ्या घरी काही दिवसापूर्वी आले. त्यानंतर माझ्या वकिलामार्फत पोलीस हवालदार लांडे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मुलास विचारपूस करण्यासाठी पाठवा असे सांगितले.त्यानंतर ठाणेदार साहेब यायचे आहेत म्हणून काही वेळ बसावे लागेल असे सांगून मुलास एका खोलीत घेवून गेले. तेथे पोलीस हवालदार किशोर सोनोने यांनी माझ्या मुलाची मान दाबून मारहाण केली.

किशोर सोनोने यांनी व मोरे आणि गणेश ज्यांचे पूर्ण नाव मला माहित नाही या तिघांनी खोली लावून बाजीराव पट्टयाने मारहाण केली. गुन्ह्याची कबुली दे असा दबाव टाकत अश्लिल शिविगाळ केली. गणेश निलखन व मोरे यांनी सुद्धा माझ्या मुलास मारहाण करीत जबरदस्ती कबुली देण्यास भाग पाडीत होते. मला व माझ्या पत्नीला सुद्धा खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षकांनी सांगितल्यावरही माझ्या मुलाला सोडले नाही व त्याचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. आमचे कुटूंब पोलिसांच्या दबावाखाली असून याप्रकरणाची चौकशी करून संबधित पोलिसांवर कायदेशीवर कारवाई करण्याची मागणी ढोरे यांनी केली आहे.

याप्रकरणातील मुलगा अल्पवयीन असल्याने त्यास बालकल्याण मंडळासमोर उभे करणार आहोत. घरफोडी प्रकरणात हा मुलगा आरोपी आहे. त्याने मोठी आजीच्या घरातून सोन्याचे दागिने, चेक, दुचाकी चोरी केली आहे. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास केला. बालन्याय मंडळात सुद्धा पोलिसांचे बयाण नोंदवले आहेत. याप्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे.

- अजित जाधव, पोलिस निरिक्षक, सिव्हील लाईन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT