Account opening facility in post for ladki bahin yojana beneficiary women akola Sakal
अकोला

Ladki bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी पोस्टात खाते उघडण्याची सुविधा

राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी महिलांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी महिलांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे.

यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने अवख्या पाच मिनीटात बॅंक खाते उखडले जाते. या सुविधाचा योजनेंतर्गत पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील आणि कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजाराच्या आत असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

लाभाची रक्कम प्रतिमाह केवळ बॅक खात्याद्वारे अदा केली जाणार आहे. योजनेसाठी महिलांच्या नावांची नोंदणी जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नोंदणी करतांना महिलांना बॅंक खात्याची झेरॅाक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.

पोस्ट पेमेंट बॅंकेत अगदी काही वेळात आणि सहजपणे खाते उघडल्या जात असल्याने महिला हे खाते उघडण्याला पसंती देत आहे. भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे. बायोमेट्रिक मशिनच्या आधारे लाभार्थ्यांची अंगठा लावून पडताळणी केली जाते आणि खाते उघडून दिले जातात.

खाते काढण्यासाठी पोस्ट पेमेंट्स बॅंकेत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र द्यावे लागत नाही, फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असावा लागतो. इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे खाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त पीएम किसान योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना उपयुक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT