chinese manjha sakal
अकोला

‘चायनीज मांजा’ विक्रेत्यांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्लॅस्टीक कॅरिबॅगवरही कारवाई करणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा (Nylon manjha) वापर व विक्री यावर प्रतिबंध असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी (ता. ३) निर्गमित केले आहेत. तथापि या आदेशान्वये कारवाई करण्यासाठी चायनीज (Nylon) मांजा तसेच ५० मायक्रॉन (50 Micron) पेक्षा कमी जाडी असणाऱ्या प्लास्टीक कॅरीबॅग (plastic carry bag) विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.

पथकाने चायनीज मांजा व प्लास्टिक थैली विक्रेत्यांवर कारवाई करावयाची आहे. चायनीज मांजामुळे दुखापतग्रस्त पक्षांना तातडीने उपचार सुविधा मिळावी यासाठी सेव्ह बर्डस या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधीही या पथकात आहेत. स्वतः जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी या पथकाच्या अध्यक्ष आहेत. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पथकाचे गठण करण्यात आले आहे.

असे आहे पथक

  • नियंत्रण अधिकारी :अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पूनम कळंबे, प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत होळकर, सेव्ह बर्ड संस्थेचे अध्यक्ष ॲड. राखी वर्मा.

  • पथक प्रमुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत मेहरे.

  • पथक सहाय्यकाचे नाव व पदनाम : सुरेंद्र जाधव म.न.पा. पोलिस कर्मचारी, मेघ शाह सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, मोक्षीत दोषी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, संतोष मोहोकार म.न.पा. पोलिस कर्मचारी, गौरव मार्य सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, रविंद्र निवाणे म.न.पा. पोलिस कर्मचारी, गुंजन हिंगे सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, भूषण पिंपळगांवकर सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी.

  • पथक प्रमुख : नंदकिशोर पाटील क्षेत्रीय अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ. सुधाकर सदाशिव म.न.पा. पोलिस कर्मचारी, मयूर दोषी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, राजकुमार जुनगडे म.न.पा. पोलिस कर्मचारी, निलेश जैन सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, इकबाल खान म.न.पा. पोलिस कर्मचारी, भूमिका दोशी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT