Administration ready for copy-free exam campaign 10th 12th Examination Instructions to deploy Sitting Team akola sakal
अकोला

Education News : ‘कॉपीमुक्त’ परीक्षेसाठी प्रशासन सज्ज!

दहावी, बारावी परीक्षा; प्रत्येक केंद्रावर ‘बैठे पथक’ तैनात करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : इयत्ता बारावी अर्थात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ता. २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा ता.२ मार्चपासून सुरू होत आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक नियुक्त करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये असे आवाहन जिल्हाशिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी केले आहे.

शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा ८६ केंद्रावर होणार असून, २४ हजार ५५५ परीक्षार्थी या परीक्षेत प्रविष्ठ होत आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा १२१ केंद्रावर होणार आहे. २५ हजार ५० विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मिळून जिल्ह्यात २०७ केंद्रांवर ४९ हजार ६०५ परीक्षार्थी परीक्षा देतील.

परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय मंडळाकडून ११ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण पाच भरारी पथकाची नेमणूक मंडळाकडून करण्यात आली आहे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचे निर्देश शालेय शिक्षण सचिव व जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी केले आहे.

वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकांचे वितरण नाही

इयत्ता दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी वितरीत करण्यात येत होत्या. मात्र, या वर्षापासून ही सुविधा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली आहे.

१० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत न करता त्या थेट परीक्षेच्या वेळी म्हणजेच सकाळच्या सत्रात ११ वाजता आणि दुपारच्या सत्रात दुपारी तीन वाजता वितरीत करण्यात येतील. ज्या क्रमाने परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल. त्याच क्रमाने परीक्षा कालावधी संपल्यावर उत्तरपत्रिका गोळा करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले असून, तशा सूचना दालन पर्यवेक्षक, परीरक्षक व केंद्रसंचालक यांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT