Pig sakal
अकोला

African Swine Fever : अकोला शहरातील वराहांमध्ये 'आफ्रिकन स्वाईन फिवर' रोगाचा प्रादुर्भाव

अकोला शहरातील वराहांमध्ये 'आफ्रिकन स्वाईन फिवर' रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - शहरातील वराहांमध्ये 'आफ्रिकन स्वाईन फिवर' रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला.

शहरात वराह मृत होत असल्याचे आढळल्यावरून नमुने भोपाळ येथील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज' यांना पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे.

आदेशानुसार, संक्रमणस्थळाच्या एक किलोमीटर परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्याचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश आहेत.

या क्षेत्रात सक्रिय संनियंत्रण व्यापक प्रमाणात व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी पूर्ण करून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी देऊन नियंत्रण ठेवावे.

मोकाट पद्धतीने होणारे वराहपालन टाळावे. घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले शिल्लक राहिलेल्या वराहांना देणे हे विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरते. ते टाळावे, तसेच निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये.

वराहपालन केंद्रातील तसेच मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा किंवा सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्ट्या त्याची विल्हेवाट लावावी.

वराहपालन करणारे पशुपालक व या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींमध्ये जागृती करावी. शेजारच्या राज्यातील वराहांचा अनधिकृत प्रवेश होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने पोलीस व चेकनाक्यांशी समन्वय ठेवावा, असे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT