Farmer Line for Agriculture Seeds sakal
अकोला

Agriculture Seeds : बियाण्यासाठी उन्हाच्या काहिलीत शेतकऱ्यांच्या रांगा; वादंगामुळे गोंधळ, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

मूर्तिजापूर शहरातील बियाणे विक्री केंद्रावर काही शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादंगामुळे गोंधळ निर्माण होऊन झालेला गदारोळ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दूर केला.

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर - पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून पेरणीची तयारी करण्यासाठी बियाण्याची व खतांची जुळवाजुळव करणारा शेतकरी बियाण्यासाठी उन्हाच्या काहिलीत कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावून त्रस्त होत आहे आणि कृषी सेवा केंद्रांवर मात्र, पुरेशा सुविधांअभावी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील बियाणे विक्री केंद्रावर काही शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादंगामुळे गोंधळ निर्माण होऊन झालेला गदारोळ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दूर केला. ठाणेदार भाऊराव घुगे यांनी पोलिस ताफ्यासह बियाणे विक्री केंद्र गाठून शिस्तीत बियाणे विक्री सुरू केली.

तहसीलदार शिल्पा बोबडे व नायब तहसीलदार रवी राऊत यांनी परिस्थितीचे आवलोकन केले व शेतकऱ्यांना धीर दिला. आपल्य पसंतीचे बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच कृषी केंद्रावर गर्दी केली होती. परिणामी लांबच-लांब रांगा शेतकऱ्यांच्या लागल्या.

भर ऊन्हात शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत असून उष्माघाताचा फटका एखाद्याला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागाणी आहे.

तेल्हाऱ्यात पोलिस बंदोबस्तात बियाणे वाटप

तेल्हारा, - पेरणीकरिता आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प असल्याने बियाण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कृषी केंद्रावर बियाणे उपलब्ध असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच सकाळी सात वाजतापासून महिलासह शेतकरी कृषी सेवा केंद्रासमोर रांगेत लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचरण करून पोलिस बंदोबस्तात बियाण्याचे वाटप करण्यात आले.

मॉन्सून तोंडावर येऊन ठाकला आहे. पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने मॉन्सूनपूर्व मशागती सोबत शेतकरी रासायनिक खते, बियाणे विकत घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. पेरणीसाठी निवड केलेल्या वाणाचा बाजारात तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी निवड केलेल्या बियाण्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या वाणाचा बियाणे मिळावे याकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत.

कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध असलेले बियाण्याचे विक्री करण्यास कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यासोबत स्वतः हजर राहून कृषी सेवा केंद्रधारकांना भाग पाडत आहेत. शहरातील कृषी सेवा केंद्रावर बियाणे उपलब्ध असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच सकाळी सात वाजतापासून रांगेत लागले होते. गर्दी होत असल्याने पोलिसांना केंद्रावर पाचरण करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT