Akala Kohinoor Industries warehouse fire sakal
अकोला

अकाेला : कोहिनूर इंडस्ट्रीजच्या गोदामाला 'भीषण आग'

लाखोंचे नुकसान; बार्शीटाकळी येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी : येथील सिंदखेड मार्गावरील कोहिनूर इंडस्ट्रीज मधील साठवलेल्या सोयाबीनच्या दोन हजार टन कुटाराच्या गंजीला सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर तीन ते चार तासांनी सदर आग आटोक्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पातूर आणि अकोला येथून अग्नीशामक विभागाच्या गाड्यांना प्राचारण करण्यात आले. एका गोदामाला आगीपासून वाचविण्यात आले, तर एका गोदामामधील सोयाबीन कुटार आगीने जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले.

बार्शीटाकळी शहरात नवीन बस स्थानकाजवळ मो. इकबाल मो. सादिक यांच्या मालकीचे कोहिनूर टेर्डसमध्ये दोन मोठे गोदाम आहेत. त्यामध्ये सोयाबीन कुटारापासून गट्‍टू बनविण्याच्या कुटाराला सोमवारी सकाळी आठ वाजता सुमारास शॉर्ट सक्रिटमुळे अचानक आग लागली. आगीमुळे सोयाबीन कुटाराने पेट घेतला.

त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझवण्यासाठी अकोला आणि पातूर येथून अग्नीशमन विभागाच्या गाड्यांना पचारण करण्यात आले. अग्नीशमन विभागाच्या जवानांनी गोदामात पाण्याच्या मारा करुन एक गोदाम आगी पासून वाचविले तर एका गोदामातील सोयाबीन कुटार जळून खाक झाले. त्या गोदामात सोयाबीन कुटाराचे आगीमुळे अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधितांनी दिली. अग्नीशामक विभागाच्या गाडीला पाणी भरण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागले.त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बराच वेळ लागला. आगीची माहिती कळताच तहसिलदार गजानन हामद यांनी घटनास्थळी भेंट दिली. यावेळी नागरिकांनी आग पाहण्याकरिता अफाट गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT