akola 146 mm in the district. Rain, heavy rain; Soybeans, however, are waiting for more heavy rains 
अकोला

जिल्ह्यात 146 मि.मी. पाऊस, पऱ्हाटी जोरदार; सोयाबीनला मात्र अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून ते शनिवारी (ता.४) सकाळी ८.३० वाजेपर्यंत १४६ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे पऱ्हाटीचे पीक बऱ्यापैकी दिसत आहे. मात्र, सोयाबीन, तूर, मूग, उडिदाच्या पिकासाठी अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.


एरव्ही मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पाऊस पडून हगामाच्या कामांना सुरुवात होते आणि जूनच्या पहिल्या किंवा फार फार तर दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून धडकायचा. गेल्या काही वर्षात मात्र ऋतूचक्रातच आमुलाग्र बदल झाला असून, तीन वर्षापासून मॉन्सून सुद्धा जवळपास १५ दिवस लांबला आहे. शिवाय गेल्यावर्षी व यंदाही मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात पूर्णपणे दांडी मारली असून, नियमित मॉन्सूनसाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

एरव्ही ६५ ते १०० मि.मी. किंवा जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यानंतरच खरीप पेरणी करण्याच सल्ला कृषी विभाग तसेच कृषी तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यानुसार यंदाही ७५ मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. शनिवारपर्यंत जिल्ह्यात १४६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, बहुतांश भागात कपाशी व सोयाबीन, मूग, उडीद, तुरीची पेरणी आटोपली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे व जेथे १०० ते १५० मि.मी. पाऊस पडला तेथे कपाशीच्या पिकाची स्थिती चांगली आहे. परंतु, सोयाबीन उत्पादकांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
 

जिल्ह्यात ४ जूनपर्यंत पडलेला पाऊस
तालुका जूनपासूनचा पाऊस (मि.मी. टक्केवारी)
अकोला १४५.८ २१.४
तेल्हारा १८४.७ २७.८
बाळापूर२४.४ १४१.५ २३.०
पातूर १९५.२ २४.४
अकोट १३९.२ १९.८
बार्शीटाकळी १४२.१ २०.३
मूर्तिजापूर ११०.३ १५.५
एकूण सरासरी १४६.९ २१.१


मस्कत आणि ओमानच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने, राज्यात येणाऱ्या मॉन्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील २४ तासात स्थिनिक वातावरण बदलानुसार विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

Horoscope Prediction : पुढच्या 72 तासात 'या' 4 राशीच्या लोकांचं नशीब बदलणार; पाहा यात तुमची रास आहे का?

Ashes, 1st Test: 0,0,0...इंग्लंड-ऑस्ट्रेलियन ओपनर आधी गंडले, मग घोंगावलं ट्रॅव्हिस हेडचं वादळ! कांगारुंनी दोनच दिवसात जिंकली मॅच

एकदम कातिल! रेखाच्या एव्हरग्रीन गाण्यावर रिंकू राजगुरूचा जबरदस्त डान्स; दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ

Movie Review : असंभव - मानवी भावभावनांची रहस्यमय गुंफण

SCROLL FOR NEXT