acid attack sakal
अकोला

Akola : एकतर्फी प्रेमातून फेकले महिला होमगार्डवर ॲसीड

पीडित महिला ही ४० वर्षांची असून ती होमगार्डमध्ये सेवारत आहे.

राजेश नागरे

वर्धा : रामनगर पोलिस ठाण्याला लागूनच असलेल्या महावीर गार्डनमध्ये आज गुरुवारी (ता. १३) रात्री ७.३०च्या सुमारास एका महिला होमगार्डवर तिच्या पुरुष सहकाऱ्याने ॲसीड फेकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी तेथे उपस्थित लोकांनी आरोपी पुरुष होमगार्डला पोलिसांच्या हवाली केले.

पीडित महिला ही ४० वर्षांची असून ती होमगार्डमध्ये सेवारत आहे. आरोपी होमगार्ड अर्जुन चाफले (वय ५०) हासुद्धा होमगार्डमध्येच आहे. पीडिता गार्डनमध्ये असताना अर्जुन तेथे आला व त्याने महिलेवर पाठीमागून ॲसीड फेकले. ॲसीड अंगावर पडताच महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे गार्डनमध्ये असलेले नागरिक धाऊन आले व त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले आहे.

फेकलेले ॲसीड बाथरूम साफ करणारे ॲसीड असल्याचे सांगितले जात असून पीडित महिलेला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT