Akola sakal
अकोला

अकोला :अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

महसूल विभागाकडून तीन लाख ९६ हजार रुपयाचा दंड

राजेश नागरे

वाडेगाव : यंदा बाळापूर तालुक्यातील काझीखेडा एक, दोन, बहादुरा, नागद या चार वाळू घाटांचा लिलाव झाला असला, तरी सागद येथील वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. काही वाळू घाट छोटे असल्याने त्याचाही लिलाव होत नाही. त्यामुळे रात्री बे रात्री अवैध वाळूची वाहतूक करून पळवापळवी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. अशातच गुढीपाडव्याच्या दिवशी मध्यरात्री उरळ आणि पहाटे-पहाटे तामसी व बटवाडी या तीन ठिकाणी महसूल विभागाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करून लाखोंचा दंड ठोठावला आहे.

बाळापूर तालुक्यात यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील मन, महेशा व पूर्णा नद्या भरभरून वाहत आहेत आणि सद्या नदीतील पूर ओसरताच तालुक्यात वाळू माफिया सक्रिय झाले असून, माफियांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून वाळूची अवैध वाहतूक सुरू केली आहे.

तालुक्यातील अंदुरा, निंबा, नागद-सागद, लोहारा, सोनाळा, हातरुण, तामसी, बटवाडी, काळबाई शिवार या परिसरात वाळू माफियांचा सुळसुळाट सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. २) मध्यरात्री एक विना नंबरच्या ट्रॅक्टर वाहनावर महसूल विभागाकडून झडती घेण्यात आली असता, त्यामध्ये एक ब्रास अवैध वाळू आढळून आली. दुसऱ्या कारवाईत वाडेगाव-तामसी रोडवर पहाटेच ट्रॅक्टर क्र. एमएच-३०-बीबी-०२०७ मध्ये एक ब्रास वाळू आढळून आली. तिसऱ्या कारवाईत बटवाडी शिवारात सकाळी एक ४०७ वाहन क्रं. एमएच-०६-जी-३८८९ या वाहनातही एक ब्रास अवैध वाळू आढळून आली. तीनही वाहनाची चौकशी केली असता, त्यांच्याजवळ वाळू करण्याचा कुठलाही परवाना आढळून आला नाही.

त्यामुळे तीनही वाहनांवर प्रत्येकी एक लाख ३२ हजार रुपयाप्रमाणे तीन लाख ९६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई बाळापूर महसूल विभागातील तहसीलदार सैय्यद एहेसानोद्दीन, मंडळ अधिकारी अब्दुल अजीज अहेमद, तलाठी आर.एम.चोपडे, तलाठी आकाश वानखडे, कोतवाल नारायण घाटोळ, माधव खंडारे, रवींद्र चक्रे, तलाठी राजेश शेळके यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT