Animal stealing sakal
अकोला

अकोला : जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

एका कारसह एकूण १३ लाख एक हाजारांचा मुददेमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गोवंश जनावर गाय, बैल, बकरी इ पाळीव प्राण्याची कारचा वापर करून चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. एका कारसह एकूण १३ लाख एक हाजारांचा मुददेमाल जप्त केला.

गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्याकडे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सोपविला होती. त्यानुसार तपास करताना कारचा वापर करून गोवंश चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मोहम्मद फईम मोहम्मद जमील (२८, रा.मंगळवारा,कोतवालीचा मागे), अजमद शाह रहेमत शाह (२२, रा.इंदीरानगर अकोट फैल), सैयद रिजवान उर्फ अन्वर सैयद अशरफ (२२, रा.युसुफ अली खदान) आ आरोपीला ताब्यात घेतले.

गुन्ह्यात वापरलेल्या एम.एम.१४ सी.एक्स. ६००५, एम.एच.०४ जी.डी.३७९९ आणि एम.एच.०४ सी.एक्स.२१३६ या तीन कार जप्त केल्यात. यासोबतच रोख रकमेसह एकूण १३ लाख एक हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला. बोरगाव मंजू, बार्शीटाकळी, सिव्हिल लाईन्स आणि उरळ पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि.गोपाल जाधव, पोलिस अंमलदार नितीन ठाकरे, गोकुळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, लिलाधर खंडारे, शेख अन्सार, सुमीत राठोड, पवन यादव, जोत्स्ना लव्हाळे, अक्षय बोबडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil : 'एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल, पण उद्योजकांना वीज मिळाली पाहिजे'; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी वर्गात संताप

धर्म बघून तडीपार केलं का? हायकोर्टाचा मुंबई पोलिसांना सवाल, आंदोलन तर सगळेच पक्ष करत होते

Live Marathi News Update : पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, जिल्ह्यात पूरस्थितीची तीव्रता वाढली

Malshej Ghat: पावसाळी सहलीचा प्लॅन करताय? माळशेज घाटाबाबत मोठी अपडेट, पर्यटकांसाठी नवी सूचना... पर्यायी मार्गांशिवाय पर्याय नाही

Kalusubai Landslide: कळसूबाईत भीषण भूस्खलन! ५० एकर भातशेती उद्ध्वस्त; २५ आदिवासी कुटुंबे थोडक्यात बचावली

SCROLL FOR NEXT