Akola BJP road Block movement for OBC reservation sakal
अकोला

अकोला : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको

आदमारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाले असताना महाराष्ट्रात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणापासून नागरिकांनी वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करीत अकोला शहरात भाजपतर्फे गुरुवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात आमदारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करून ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकर ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जनतेशी बेईमानी करून महाजनादेशाचा अपमान करीत सत्तारूढ झालेल्या तीन पक्षांकडून अपेक्षातरी काय करणार, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार सावरकर यांनी ओबीसी आरक्षणबाबात भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथील लोकनायक जयप्रकाश नारायण चौकात भाजपच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला.

भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपचे सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात निकाल लागताच आरक्षण मिळविण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसींना न्याय मिळवून दिला. परंतु दोन महिने झाल्यावर सुद्धा महाविकास आघाडी सरकरातर्फे महाराष्ट्रातील ओबीसी जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कोणतीही हालचाल करता आली नाही, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार सूचना करून सुद्धा त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडी ओबीसीसह समाजातील अठरा पगड जाती समाजावर अन्याय करत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी आमदार सावरकर यांनी केला. मध्यप्रदेशला जमले ते महाराष्ट्राला का करता येत नाही? देशपातळीवर राजकारणाची भाषा करणारे ओबीसींचे नेते सध्या कुठे आहेत, असाही सवाल भाजपचे महानगराध्यक्ष ‌विजय अग्रवाल अग्रवाल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT