Akola Buldana News Proposal, we will approve medical college immediately, assurance of Chief Minister Uddhav Thackeray, task force in every district to fight corona
Akola Buldana News Proposal, we will approve medical college immediately, assurance of Chief Minister Uddhav Thackeray, task force in every district to fight corona 
अकोला

प्रस्ताव द्या, लगेच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स

अरूण जैन

बुलडाणा  : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्‍घाटनऩ कार्यक्रमात केले.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतांनाच प्रशिक्षीत वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून, त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आपण लगेचच मान्यता देऊ, असे आश्वासनाची यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन केले.

याप्रसंगी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, दे. राजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, बुलडाणा कृउबास सभापती जालिंधर बुधवत, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, मो. सज्जाद आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रास्ताविकात बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगाव राजा येथील टाटा ट्रस्टच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये सांगितली. जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून ते ही लवकरच पुर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करून दोन्ही रुग्णालय उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली.याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलू शकतो, अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समुहाला त्यांनी धन्यवाद दिले.


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केवळ अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रुग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. त्यासाठीच बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव द्या, त्यास लगेचच मान्यता देऊ अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले. यावेळी टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. श्रीनाथ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागतपर भाषण जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी केले.

Video : कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांचा रास्ता रोको

प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स
कोविड वरील उपचारांसाठी आवश्यक औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता, प्राणरक्षक औषधे यासारख्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सला असणाऱ्या कोणत्याही मार्गदर्शनासाठी ते विनाविलंब मुंबई स्थित टास्क फोर्ससी संपर्क साधून मदत मिळवू शकतात, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
पदभरती गतिमान करू - आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टाटा समुहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अद्ययावत रुग्णालय जिल्ह्यात सुरू होत असल्याबाबत आनंद आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक पदांची भरती अधिक गतिमानतेने पूर्ण करून सर्व रिक्त पदे भरू, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT