Akola News sakal
अकोला

Akola News: बसचालकाची मुलगी झाली राज्यकर निरीक्षक

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उडी घेतात

रवी वानखडे

तरोडा : सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उडी घेतात, मात्र अपयश आल्याने अनेक जण खचून जातात. परीक्षेत प्रत्येकालाच यश संपादित होने शक्य नसतं. परंतु, मेहनत केली तर यशाचे शिखरही आरामात गाठता येत असल्याचे दाखवून दिले ते एका बस चालकाच्या मुलीने. मेहनत आणि जिद्दीच्या भरोषावर प्रतीक्षा इंगळे (बगाडे) हिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली.(Akola News)

एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा देवून आपणही अधिकारी व्हावे, असे स्वप्न मनाशी प्रतीक्षा इंगळे (बगाडे) या बस चालकाच्या मुलगी बाळगले. प्रतीक्षाचा जन्म हा अमरावती जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये झाला.

आई तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यामुळे प्रतीक्षाचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण दानापूर येथे आणि विद्यालयात शिक्षण अकोट येथील श्री शिवाजी विद्यालयात झाले. प्रतीक्षा लहानपणापूनसच मेहनती आणि होतकरू आहे. आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने तिने शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले. आधी परिवारातील सदस्यांकडून शिक्षणासाठी नंतर पोलिस कर्मचारी असलेल्या पतीनेही प्रतीक्षाला आपले शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी भरपूर साथ दिली.

एका विवाहित महिलेला शिक्षणासाठी मिळालेल्या संधीचे सोने प्रतीक्षाने करून दाखविले. त्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली. सासरकडील मंडळीनेही तिला पाहिजे तेवढे सहकार्य केल्याने यश पदरी पडले. तिने पहिल्याच प्रयत्नात राज्य कर निरीक्षक पदाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे अकोल्याच्‍या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. प्रतीक्षा आपल्या यशाचे श्रेय तिचे पती दीपक बगाडे (रा. कावसा), आई संगीता इंगले, वडील प्रमोद इंगळे, जेठ गजानन बगाडे, सासू सुनंदा बगाडे, इतरत्र सर्व कुटुंबीयांना देते. प्रतीक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT