sanajy rathod esakal
अकोला

Akola : शाळा बंद न करण्यासाठी मंत्रिमंडळात घेणार निर्णय : पालकमंत्री संजय राठोड

शाळा बचाव समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

वाशीम : महाराष्ट्र शासनाने ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. वाशीम जिल्ह्यात शाळा बचाव समितीच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आहे.

याबाबत दि. २१ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री संजय राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आले असता त्यांची शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील कुठलीही शाळा बंद करण्यात येणार नाही. याबाबत मंत्रिमंडळात लवकरच आम्ही चर्चा करणार आहोत आणि सकारात्मक निर्णय घेणार आहोत. असे आश्वासन संजय राठोड यांनी शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

वाशीम जिल्ह्यात ज्या-ज्या गावातील शाळा बंद होणार आहेत त्या गावातील पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यात विविध आंदोलने सुरू आहेत. शाळा बचाव समितीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हास्तरीय आंदोलन पुकारले आहे. वाशीम जिल्ह्यासह राज्यभरातील कुठलीही शाळा पटसंख्येच्या कारणावरून बंद करू नये, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने २१ सप्टेंबर २०२२ रोजी एक पत्र काढून राज्यातील शून्य ते वीस विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळांची माहिती मागवून त्या शाळा बंद करण्याची कार्यवाही कुठपर्यंत आहे अशी माहिती जिल्हास्तरावरून मागविली आहे. त्यामुळेच सदर शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या या निर्णयाविरोधात शाळा बचाव समितीने आंदोलन हाती घेतले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज पालकमंत्री ना. संजय राठोड यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी ना. राठोड यांनी मी याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी शाळा बचाव समितीचे मार्गदर्शक रामकृष्ण कालापाड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, जिल्हा महासचिव पी. एस. खंडारे , कोषाध्यक्ष सुरेश इंगोले , सहसचिव अजय सोनुनकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राम पाटील डोरले, प्रा. इस्माईल पठाण, दत्तराव वानखेडे, विजयराव शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT