The court  sakal
अकोला

अकाेला नकली नोट प्रकरण : ‘ते’ तीनही आरोपी राहणार कारगृहातच

नकली नोट प्रकरण; आरोपींचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : नकली नोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने आरोपींना आणखी कारगृहाताच राहावे लागणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर तीनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

तालुक्यातील पचंगव्हाण फाटा येथे दोन चारचाकी गाड्यामध्ये आलेले चार तरुण ५०० रुपयाच्या नोटासारख्या दिसणाऱ्या भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेल्या नोटा देऊन चिल्लर मागत असलेल्या आरोपींना पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे पोलिसांना ५०० रुपयांच्या भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेले चार बंडल आढळून आले होते.

आरोपींकडून पोलिसांनी २३ लाख ९६ हजार रुपयांच्या ५०० रुपयांच्या चलनी नोटा सारख्या दिसणाऱ्या नोटा व ५४ हजार रुपयांच्या चलनी नोटा, चारचाकी वाहन क्र. एमएच-४३-एएल-७७६ अंदाजे किमत दहा लाख रुपये, क्रेटा कंपनीची चारचाकी क्र एमएच-०३-सीएस-२७४३ किंमत अंदाजे १२ लाख रुपये असा एकूण २२ लाख ५४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता. अमित आत्माराम कटारे (वय २७ ), अमोल गोविंदा कटारे (वय २२) दोघेही रा.चिताळा ता.मानोरा जि.वाशीम, वैभव चंदू दयाळ (वय २२) रा.हिवरदरी ता.महागाव जि.यवतमाळ या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. १९ फेब्रुवारी रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपींच्या अडचणी वाढल्या असून, तीनही आरोपींना कारगृहातच राहावे लागणार आहे.

चवथा आरोपी अद्यापही फरारच

सदर प्रकरणातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील विजय ठाकूर हा आरोपी अद्यापही फरार असून, त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या मुचक्या आवळण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT