akola sakal
अकोला

अकोला : मुले चोरणारी टोळी, ही तर अफवाच...!

पोलिसांचे नागरिकांना विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना अकोला किंवा शेजारच्या जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे अप्पर पोलिस अधीक्षकांनी सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना अकोला जिल्ह्यात किंवा आजू बाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यात कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नसून, अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

२४ तास गस्त

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिसांची २४ तास दिवस-रात्र गस्त सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी दिली.

शाळा-महाविद्यालयांना सतर्क राहण्याची सूचना

शाळा, महाविद्यालय प्रशासनाने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वस ठेवू नये. अशा अफवा पसरवू नये. असे काही आढळून आल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला तत्काळ माहिती द्यावी, अशी सूचना शाळा-महाविद्यालयांना करण्यात आली असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

अफवांना कुठे झाली सुरुवात?

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरविणारी चित्रफित सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात काही नागरिक एका मारहाण करताता दाखवित असून, ही व्यक्ती लहान मुलांना पळवून नेताना आढळून आली असून, तिचे साथीदार जिल्ह्यात फिरत असल्याचे या चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. एका ठिकाणी या अफवेतून चार साधूंना तर अन्य एका घटनेत तृतीय पंथियाला मारहाण झाली. तिच चित्रफित दाखवून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी अकोला जिल्ह्यातही सक्रिय असल्याची अफवा पसरली जात आहे. मात्र, ही चित्रफित खोटी असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT