akola sakal
अकोला

Akola : बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

पोस्को विशेष न्यायालयाने आरोपीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात साडेचार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ७५ वर्षीय नराधम विठ्ठल मारुती पारिसेला पोस्को विशेष न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच अडीच लाख रुपये दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. ही घटना माना पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ता. २४ जुलै २०१९ रोजी घडली होती.

माना पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावामध्ये एक चार वर्षाचा मुलगा घराबाहेर खेळत होता. त्याच्या शेजारी राहणारा विठ्ठल मारुती पारीसेने मुलाला चॉकलेटचे आमिष देऊन घरात बोलावले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याच वेळी तेथे वर्गणी मागण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी घरात कोणी आहे का, यासाठी आवाज दिला.

घरातून उत्तर येत नसल्यामुळे त्या महिलांनी दरवाजा लोटून आत डोकावून पाहिले. त्या महिलांना विठ्ठल पारिसे हा त्या मुलावर अत्याचार करीत असल्याचे त्यांना दिसले. या दोन महिलांना पाहून पीडित बालक हा रडत घरी पळत गेला. त्या दोन महिलांनी पण त्या पीडित बालकाच्या आईला संबंधित घटना सांगितली. पीडित मुलाचे वडील रात्री घरी आल्यानंतर त्यांनी ता. २५ जुलै २०१९ रोजी माना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

पोलिसांनी यामध्ये भादंवी कमल ३७७, पोस्को तीन, चार, पाच आणि कलम सात, आठ, नऊ नुसार गुन्हा दाखल केला. माना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय खंडारे आणि पोलिस उपनिरीक्षक विजय महाले यांनी यामध्ये तपास केला. यामध्ये विठ्ठल पारिसे यास अटक केली आहे. तेव्हापासून तो कारागृहात होता. या प्रकरणी पोस्कोच्या विशेष न्यायालयमध्ये प्रकरण सुरू होते. न्यायालयाने यामध्ये आठ साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही.

विशेष न्यायालयाने कलम ३७७ मध्ये जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड तसेच पोस्कोमध्ये जन्मठेप व एक लाख रुपये दंड तसेच कलम सात, आठ, नऊमध्ये पाच वर्षे शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडातील अर्धी रक्कम ही पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. मंगला पांडे यांनी युक्तिवाद केला.

वैद्यकीय अधिकाऱ्याची होणार चौकशी

पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित जोशी हे या प्रकरणात अडचणीत आले आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहे. डॉ. सुमित जोशी यांनी वैद्यकीय अहवालात खोडताड केल्याने न्यायालयाने यावर आक्षेप घेतला. त्यानुसार चौकशीचे आदेश दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT