Akola
Akola sakal
अकोला

Education : होय... अकोलाही ‘एज्यूकेशन हब’ होऊ शकतं!

सकाळ वृत्तसेवा

- अ‍ॅड. डॉ. आशिष बाहेती

अकोला शहराची ओळख ‘कॉटन सिटी’ अशी आहे. याशिवाय या शहराला अनेक वैभवशाली ओळखी आहेत. ''राजराजेश्वर नगरी'', पराक्रमी राजा अकोलसिंगनं वसवलेलं शहर... असदगड किल्ला असणारं शहर... अशा अध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळखीही शहराला मिळाल्या आहेत. औद्योगिकदृष्ट्या ‘कॉटनसिटी’ ओळख असलेलं अकोला देशातील दुसऱ्या क्रमांकाचं ‘दालमिल हब’ही आहे. अलिकडच्या दहा वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात अकोल्यानं मोठी भरारी घेतली आहे. जवळपास सर्वच आजारांवर उपचार आपल्या अकोल्यात उपलब्ध आहेत. त्यामुळेच नागपूरनंतर विदर्भाचं ‘मेडीकल हब’ म्हणून अकोल्याची ओळख आहे.

उच्चशिक्षणाच्या अनेक संधी आपल्या शहरात आहेत. मेडीकल, इंजिनिअरींगचं शिक्षण देणारी कॉलेजेसही आहेत. अनेक कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मेडीकल-इंजिनिअरींगचे शेकडो विद्यार्थी दरवर्षी यशस्वी होत असतात. राजस्थानमधील कोटा, महाराष्ट्रातील पुणे, कधीकाळी लातूर या शहरांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळाला भूरळ घातली होती. एकीकडे प्रत्येक शहरानं शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व निर्माण केलेलं असताना यात अकोला मागे का?, हा प्रश्न माझ्यासारख्या या शहरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सतावणारा आहे.

अकोला शहरानं कधीकाळी प्रत्येक शिक्षणात स्वत:चा नावलौकीक देशपातळीवर निर्माण केला आहे. युपीएससी, एमपीएससी, बँकींगसारख्या स्पर्धा परिक्षांचं शिक्षण असो... मेडीकल-इंजिनिअरींगचं असो... की अगदी पोलिस भरती, लिपिक भरती अथवा तलाठी-पटवारी पदाचा अभ्यास... प्रत्येक ठिकाणी आपलं नावं होतं. आजही ‘चार्टड अकाऊंटंट’ शिकवणीतलं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं दुसरं केंद्र अकोला आहे. या शहरानं देशाला आणि राज्याला अनेक नामवंत ‘सीए’ दिले आहेत. दरवर्षीच्या सीएच्या निकालात ‘ऑल इंडिया रँकींग’मध्ये सर्वाधिक वाटा अकोला शहराचा असतो.

अलिकडच्या दशकभरात स्पर्धेच्या नावाखाली शहराची ही शैक्षणिक क्षेत्रातील वैभवशाली ओळख हळूहळू धुसर व्हायला लागली आहे. अलिकडे तर ही ओळख पुसली जाते की काय?, अशी शंका मनात निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाल्याचं दुर्दैवी चित्रं निर्माण झालं आहे.

अकोला हे सर्वार्थानं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. रेल्वे, बस आणि लवकरच नजिकच्या भविष्यात विमानसेवेची मोठी कनेक्टीव्हीटी आपल्या शहराला आहे. यासोबतच विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी अकोला शहर सर्वार्थाने सुरक्षित असं शहर आहे. यासोबतच सुसज्ज आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण असलेल्या चांगल्या अभ्यासिकाही अकोल्यात आहे. इतकं चांगलं ‘एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर’ या शहरात असतांनाही आपण नावलौकीकात का मागे पडतोय, याचा गांभिर्यानं विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

ही कारणं टाळता येऊ शकतात : शहरातील काही कॉर्पोरेट क्लासेस सोडले तर ७५ टक्के क्लासेस सध्या ‘ऑक्सिजन’वर आहेत. अकोल्यातील कोचिंग क्लासेस आणि सहव्यवसायाची फी खूप जास्त आहे. यामुळेच राज्यभरातील पालक अकोल्यात मुलांना पाठवू पहात नाही. दुसरा महत्त्‍वाचा मुद्दा आहे समन्वयाचा. अकोल्यातील क्लासेस व सहव्यवसायांचा आपसात समन्वय नाही. तिसरा मुद्दा आहे निकोप स्पर्धेचा. कोणतीही स्पर्धा निकोप असली तर त्यातून सकारात्मतेचं बिजारोपन होऊ शकतं. मात्र, शहरातील कोचिंग क्लासेसमधली स्पर्धा ही शत्रूत्वाची आहे. प्रत्येकजण आपली रेषा मोठी करण्याऐवजी दुसऱ्याची रेषा लहान कशी होईल?, यासाठीच अधिक प्रयत्न करीत आहेत. यातून अकोल्याचं शिक्षण क्षेत्रं बदनाम होत आहे. एकंदरीत क्लासेसमधील अंतर्गत संवाद थांबल्यानं विचारांचं आदान-प्रदान थांबलं आहे. यासोबतच शिक्षण क्षेत्रातील नव्या प्रवाहांच्या संधी तशाच थांबल्या आहेत. या सर्व गोष्टी शिक्षण क्षेत्रातील ‘अकोला पॅटर्न’च्या मार्गातील सर्वात मोठे गतिरोधक ठरल्या आहेत.

आपण हे करूयात : अकोल्याचा शिक्षण क्षेत्रात ‘ब्रँड’ स्थापित करायचा असेल तर काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकोल्यातील शिक्षण सर्वसामान्य माणसालाही परवडावं यासाठी सर्वात आधी फी कमी करावी लागेल. यासाठी सर्व क्लासेस आणि सहव्यवसायींनी आपसात चर्चा करून यासंदर्भातलं सर्वंकष धोरण ठरवावं. सर्व क्लासेस आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी आपसात मैत्रीपूर्ण स्पर्धा ठेवावी. सोबतच छोट्या क्लासेसनी एकत्र यावे म्हणजे त्यांना मार्केटिंगचा आणि इतर सर्व खर्च करता येईल. या सर्व गोष्टींचा सर्व क्लासेसनी गांभिर्यानं विचार करणं आता गरजेचं आहे.

‘जिवो जिवस्य जीवनम्’ असं म्हटलं जातं. एक-एक मणी गुंफल्यानंतरच त्याचा सुंदर असा हार बनतो. अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रानं आता जुनी जळमटं बाजूला फेकत आता नव्या बदलांना सामोरं जावं. कारण, यातूनच अकोल्याच्या शिक्षण क्षेत्राचा, अकोल्याचा अन् पर्यायानं देशाचाही फायदा होईल. राष्ट्रनिर्मितीच्या या महत्त्वाच्या विषयावरील मी मांडलेल्या विचारांवर निश्चितच सकारात्मकपणे आणि गांभिर्याने विचार होईल याच अपेक्षेसह.

कर सल्लागार आणि समाजसेवक, अकोला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT